Ad will apear here
Next
सॉफ्टवेअर बनले दिव्यांगांचा आधार


सोलापूर :
सोलापूर येथील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिव्यांग व्यक्तींना उपयोगी ठरेल असे ‘ दिव्यांग आधार’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी केल्यानंतर दिव्यांगांना शासकीय योजना, तसेच सामाजिक संस्थांची आणि नोकरीसंदर्भातील माहिती एसएमएसद्वारे मिळू शकते. दिव्यांगांचा त्रास कमी करणारे हे सॉफ्टवेअर विकसित केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी शाखेच्या उमाकांत तोखी, प्रसन्न जोशी, शेहजाद मनियार, लुकमन दलाल या विद्यार्थ्यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून, विविध सामाजिक संस्थांकडून या सॉफ्टवेअरला पसंती मिळाली आहे. ‘आधार’सारखे दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर  सध्या उपलब्ध नसल्याने या सॉफ्टवेअरची मागणी वाढत असल्याचे उमाकांत तोखी यांनी सांगितले. 

या सॉफ्टवेअरमध्ये दिव्यांग व्यक्तींनी स्वतःची माहिती एकदा भरावी लागते. त्यानंतर सॉफ्टवेअर त्या व्यक्तीला शासनाच्या राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देते. शासनाच्या विविध डेटाबेसमध्ये या दिव्यांग व्यक्तींची माहिती नोंदली जाते. त्यानंतर सामाजिक संस्था व समाजकल्याण विभागामार्फत त्या दिव्यांग व्यक्तीला मदतीची माहिती एसएमएसद्वारे दिली जाते.

‘महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील विद्यार्थांनी बनविलेल्या अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतील लोकांना मोठा फायदा होत आहे. यासाठी विद्यार्थांचे प्रयत्न व त्यांना प्राध्यापकांचे मिळालेले मार्गदर्शन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत,’ असे ए. जी. पाटील महाविद्यालयाच्या कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांनी सांगितले. ‘ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य व्ही .व्ही. पोतदार, श्री. विजापुरे यांनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. विजापुरे - ९९२२३ ७०११३
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZOSBS
 छान बातमी वाचायला मिळाली .
 खूपचं छान आणि कौतुकास्पद आहे. असचं प्रगती करत राहा.1
Similar Posts
अरण्यऋषी (व्हिडिओ) आपल्या अरण्यातल्या भ्रमंतीतून स्वतःचं आयुष्य समृद्ध करणारे, निसर्गाच्या समृद्धीबद्दलचं विपुल लेखन करून मराठी भाषेला लाखभर नव्या शब्दांची समृद्धी देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा पाच नोव्हेंबर हा जन्मदिन. आज त्यांना ८८ वर्षे झाली. गेल्याच महिन्यात म्हणजे ११ ऑक्टोबर २०२० रोजी मारुती चितमपल्ली यांनी
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आंब्यांची सजावट पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आज सुंदर अशी आंब्याची सजावट करण्यात आली होती. करोनाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे घालण्यात आले.
लॉकडाउनने दाखवला केळी प्रक्रिया उद्योगाचा मार्ग; विद्यार्थ्यांचाही सहभाग सोलापूर : स्वतः कष्टाने पिकविलेला शेतीमाल शेतात वाया जाऊ नये म्हणून रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी कलिंगडे, केळी परिसरातील कुटुंबांना दान केली. कच्च्या केळ्यांचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करण्याचा उपक्रम सध्या या भागात राबविला जात आहे. विशेष
रोपळे गावातील पाटील विद्यालयात आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आकाशकंदील कसा बनवावा आणि तो कसा सजवावा याची प्रात्यक्षिके विद्यार्थी-विद्यार्थिनींना दाखवून ते करण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language